प्रकाश पदुकोण आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना दहा दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाची लक्षणे दिसली. जेव्हा त्यांची चाचणी झाली तेव्हा त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. या सगळ्यांनी स्वतःला आयसोलेट केले होते. मात्र आठवड्याभरा -नंतरही प्रकाश यांचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचीही कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आई उज्जला आणि धाकटी बहीण अनिशा याही होम क्वारंटाइन आहेत. दीपिकाही होम क्वारंटाइन झाली आहे.