अमेरिकेत १२ ते १५ वर्षांच्या मुलांचेही कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार आहे. त्यासाठी एफडीएने फायझर-बायोएनटेकच्या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या निर्णयानंतर सांगितले की, कोरोनाविरुद्धच्या लढाईतील हे मोठे पाऊल आहे. कॅनडानेही फायझरच्या लसीला १२ वर्षांवरील मुलांसाठी मंजुरी दिली आहे.
भारतातही सीडीएससीओ समितीने भारत बायाेटेकच्या काेव्हॅक्सिन लसीची २ ते १८ वर्षांच्या मुलांवर क्लिनिकल ट्रायलची शिफारस केली आहे. त्याला डीसीजीआयची मंजुरी बाकी आहे.