सिंधुदुर्ग -अभिमन्यू वेंगुर्लेकर.
सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती कोविड रुग्णसंख्या पाहता त्यांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे यासाठी ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने ग्रामपातळीवर ग्रामविलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या सुचना केल्या आहेत.
या सुचनेचा विचार करुन आंदुर्ले ग्रामस्तरीय नियंत्रण समिती, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, शिक्षक, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, श्री चामुंडेश्वरी देवस्थान समिती यांच्या सहकार्यातून १० बेडची व्यवस्था करुन लोकसहभागातून ग्रामविलगिकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सौम्य स्वरुपाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांना गृहविलगिकरणात न ठेवता याठिकाणी दाखल केलं जातं. पुरुष व स्त्रियांची स्वतंत्र व्यवस्था, पिण्यासाठी फिल्टरचे पाणी, पुरुष व स्त्रियांना स्वतंत्र संडास बाथरुमची सोय, मनोरंजनासाठी टीव्ही, गॕस सिलिंडरची सोय, पाणी गरम करण्यासाठी लाकडे इत्यादी आवश्यक सोयी उपलब्ध केल्या आहेत. दाखल केलेल्या रूग्णांचा SPO2 आणि थर्मल गनद्वारे तापमान तपासणी करुन रुग्ण नियमित औषधं घेत असल्याची खात्री आरोग्य कर्मचारी करतात. रुग्णांना आवश्यक असणारी औषधेही उपलब्ध करुन दिली जातात. कक्षामध्ये पल्स अॉक्सिमीटर आणि थर्मल गन उपलब्ध करुन ठेवलेली आहे. आवश्यकतेनुसार१०८ तसेच अतितातडीच्या वेळी उपलब्ध रुणवाहीकेचा वापर करुन रुग्णांना डाॕक्टर व आरोग्य सेवक यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी कुडाळला पाठवले जाते.
ग्रामविलगीकरण कक्षात १० दिवस दाखल केल्यानंतर रूग्णांना कोणतीही लक्षणं न आढळल्यास ७ दिवस गृहअलगीकरण(Home Isolation) केले जाणार आहे