⭐ सुनीता आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगनद्वारे परत येतील,-नासा
सुनीता विल्यम्स तिचा सहकारी बुच विल्मोर याच्यासोबत जूनमध्ये बोइंग स्टारलाइनरने अंतराळात गेली होती. केवळ एक आठवड्यासाठी हे दोघेही मिशनसाठी अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर गेली होती. पण तांत्रिक बिघाडामुळे त्यांना आता वर्षभर राहावं लागत आहे. हिलीयम लीक झाल्याने आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा हवाई प्रवास आता अनेक महिन्यांसाठी वाढला आहे. त्यांना वर्षभर अंतराळातील आंतरराष्ट्रीय सुनीता विल्यम्स – स्पेस स्टेशनला राहावं लागणार आहे. त्यामुळे सर्वांनाच तिची चिंता वाटू लागली आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एनएलएफटी-एटीटीएफमध्ये/
दरम्यान, सुनीताने तिच्या आईला अंतराळातून एक मेसेज पाठवला आहे. आपण लवकरच पृथ्वीवर येणार आहोत. सुरक्षित येणार आहोत, असं सुनीताने या मेसेजमध्ये म्हटलं आहे. तसेच आईला कोणतीही काळजी करू नको म्हणून सांगितलं आहे. सुनीताच्या या मेसेजने तिची आईच नव्हे तर अख्खं जग गहीवरून गेलं आहे. सुनीता विल्यम्सची आई बोनी पंड्या यांनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी सुनीताचा मेसेज सांगितला. सुनीताने अंतराळ वीर-काळजी करू नकोस म्हणून सांगितलं. अंतराळात तुला अधिक काळ राहावं लागणार आहे, असं बोनी यांनी सुनीताला सांगितलं. तेव्हा, मी अंतराळवीर झाले तेव्हापासून तिसऱ्यांदा मी अंतराळात गेले आहेत. काही समस्या आल्या आहेत. पण ही काही मोठी समस्या आहे, असं आम्हाला वाटत नाही. आम्ही सुरक्षित परतू एवढंच नासा पाहत आहे. त्यामुळेच आम्ही काही काळ अधिक अंतराळात राहण्याचा निर्णय घेतला आहे, असं सुनीताने म्हटल्याचं बोनी यांनी सांगितलं. दोन्ही अंतराळवीरांना २०२५ पर्यंत अंतराळात राहावं लागेल. सुनीता आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगनद्वारे परत येतील, असं नासाने अधिकृत निवेदनात म्हटलं होतं.