आयुर्वेदाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी संकल्प करा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
100
आयुर्वेदाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी संकल्प करा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 22 : आयुर्वेद हे भारतातील प्राचीन शास्त्र आहे. कर्करोगावर उपचारासाठी आयुर्वेद संस्था मोठ्या प्रमाणावर संशोधन करीत आहेत. तसेच कोरोनाच्या संसर्गावरही नियंत्रण मिळावे यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. भारताच्या योगविद्येलाही जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आयुर्वेदाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी आयुर्वेद चिकित्सकांनी संकल्प करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे .
यावेळी आयुष मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेच्या वतीने कोविड प्रतिबंधक ‘आयुरक्षा किट’ मोफत वाटण्याच्या अभियानाचा आरंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन करण्यात आला.

आपण स्वतः आयुर्वेदामुळे गंभीर आजारातून वाचलो आहे असे सांगत त्यांनी कर्करोगावरील संशोधनसुद्धा एकत्रितरित्या केले जावे, तसेच आयुर्वेद वैद्यांनी स्वतःच्या शास्त्राबद्दल अभिमान व निष्ठा बाळगत रुग्णांना बरे करावे असे सांगताना आयुर्वेदिक औषधांसोबत त्यासोबत ऍलोपॅथीची औषधे मिक्स करू नये त्यामुळे ते योग्य ठरत नाही, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले.आयुष मंत्रालयाने आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच युनानी यांसारख्या चिकित्सा पद्धतींना प्रोत्साहन दिले असून आगामी काळात आयुर्वेद घरोघरी पोहोचेल असा विश्वास डॉ दीपक राऊत यांनी व्यक्त केला

यावेळी सार्वजनिक आरोग्य केंद्रीय प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे संचालक डॉ दीपक राऊत व केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषद मुंबईचे प्रभारी संचालक डॉ आर. गोविंद रेड्डी व्यासपीठावर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here