आज पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पंजाब,गोवा,उत्तरप्रदेश,उत्तराखंड,आणि मणिपूर या पाच राज्यांचे निकाल आज जाहीर होणार असून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अवघ्या काही तासांच सर्व काही चित्र स्पष्ट होणार आहे. या पाचही राज्यांची सत्ता कोणत्या पक्षाच्या हातात जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यूपी राज्य राजकीयदृष्ट्या खूपच महत्वाचे मानले जाते. त्यामुळे उत्तरप्रदेशकडेच सर्वांचे जास्त लक्ष लागले आहे. मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात म्हणजे 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च दरम्यान याठिकाणी मतदान पार पडले होते. गोव्यात 40 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. गोवा, पंजाब आणि उत्तराखंड या तिन्ही राज्याचे मतदान एकाच दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला पार पडले होते. उत्तर प्रदेशप्रमाणे इतर चारही राज्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपला जवळपास 50 जागांचे नुकसान होत असून अखिलेश त्याचा फायदा घेत आहेत. सपाला 60 पेक्षा जास्त जागांचा फायदा होत आहे. सर्वात वाईट स्थिती बसपा आणि काँग्रेसची आहे, ज्यांनी आतापर्यंत 10 चा आकडाही गाठलेला नाही. सोनिया गांधींचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेलीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपच्या अदिती येथे आघाडीवर आहेत.