एअर इंडियाने काबूलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणले

0
98

अफगाणिस्तानमधील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. एकानंतर दुसऱ्या प्रांतावर तालिबानचे वर्चस्व निर्माण तालिबानच्या विरोधात लढणारे गटही आता शरणागती पत्करू लागले आहेत. माजी मंत्री, हेराट प्रांताचे गव्हर्नर, पोलिस प्रमुख, एनडीएस कार्यालयाचे प्रमुख यांना तालिबानने ताब्यात घेतले आहे .अमेरिका, ब्रिटन, कॅनडानेदेखील आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे .एअर इंडियाने काबूलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणले.

एअर इंडियाचे एक विमान रविवारी संध्याकाळी काबूलमधील भारतीयांसह दिल्लीला रवाना झाले होते.एअरबस A320 विमान दिल्लीहून सकाळी 12.43 वाजता उड्डाण केले आणि दोन तासांनंतर दुपारी 1.45 वाजता काबूलमध्ये उतरले. तेच काबूलहून दुपारी 4.15 वाजता उड्डाण करणार होते, परंतु ते 5.03 वाजता उड्डाण करू शकले. हे विमानाने 129 प्रवासी परतले आहे.

अफगाणिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अफगाण नागरिकांबरोबरच इतर देशांतील लोकही येथून पळून जात आहेत. काबूल विमानतळावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here