कार्तिक आर्यनच्या सस्पेन्स थ्रिलर ,’धमका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

0
125

अभिनेता कार्तिक आर्यन  पहिल्यांदाच सस्पेन्स थ्रिलर ‘धमाका’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यात कार्तिक एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन पत्रकार अर्जुन पाठकची भूमिका साकारताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन अतिशय इंटेन्स भूमिकेत दिसतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे.

या चित्रपटात कार्तिक एक एक्स न्यूज अँकर अर्जुन पाठकची भूमिका साकारत आहे. त्याला त्याच्या रेडिओ शोवर एक अलार्मिंग कॉल येतो आणि त्याला करिअरमध्ये पुनरागमन करण्याची संधी दिसते. मात्र अर्जुन पाठकला यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खेळवून ठेवणारा आहे.हा चित्रपट चित्रपटगृहात आल्यानंतर थेट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here