कुडाळ येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट

0
100

राज्यभर सुरु असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ एस. टी. डेपोमध्ये भेट देऊन आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. आ. वैभव नाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून एस. टी. कार्मचाऱ्यांचे आंदोलन थांबविण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, शहर प्रमुख संतोष शिरसाट, सचिन काळप, राजू गवंडे आदी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here