▪️लक्षणे अंगावर काढू नका; शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे नागरिकांना आवाहन
मालवण * मालवण तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. अनेकांनी आपले नातेवाईक गमावले आहेत. अश्या स्थितीत लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांनी तात्काळ कोरोना टेस्ट करून वेळेत उपचार घ्या. लक्षणे अंगावर काढू नका, कोरोनाला हलक्यात घेऊ नका. असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी केले आहे.