कोरोना संसर्गाच्या अतिगंभीर रुग्णांना उपचार देताना स्टिरॉईस्डचा वापर केला जात आहे.पण रुग्ण लौकर बरे व्हावेत म्हणूनही काही ठिकाणी स्टिरॉईडचा अति वापर होत आहे. त्यामुळे देशभरात जवळ -जवळ ५०० रुग्णांना मुकेरमायकॉसिसची लागण झाली आहे आणि काही रुग्ण प्राणाला मुकले आहेत.ऑल इंडिया मेडिकल सायंसेज (AIIMS) दिल्लीचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनीही ब्लॅक फंगसचे प्रकार वाढण्याचा इशारा दिला आहे. डॉ. गुलेरिया यांनी रुग्णालयांना संक्रमण नियंत्रण प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याचे आवाहन केले.
कोरोना पीडित अनेक रुग्णांना मधुमेह देखील असतो. अशा रुग्णांना स्टेरॉइड्स दिल्यास त्यांना फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी, रुग्णाला अत्यंत विचारपूर्वक स्टेरॉइड्स देण्याची आवश्यकता आहे.हा आजार काळ्या बुरशीचा असून मधुमेहाच्या रुग्णांमध्ये चेहरा, नाक, डोळ्याची लेअर आणि मेंदू यावर या बुरशीचा परिणाम होऊ शकतो. तसेच काळ्या बुरशीचा संसर्ग फुफ्फुसांमध्ये देखील पसरू शकतो.