कोरोनाची लस घेतल्यानंतर ८ दिवसांनी तुमच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. जर तुम्ही कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर तुम्ही इतरांपासून अंतर ठेवा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर किमान 14 दिवस स्वतःची काळजी घ्या आणि आरोग्याशी संबंधित कोणत्याही बदलाकडे दुर्लक्ष करू नका. जरी कोरोनाचे लसीकरण झालेल्या लोकांद्वारे संक्रमणाचा धोका खूप कमी असला तरीही त्यांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर सर्वप्रथम चाचणी करुन घ्या.लसीकरण केलेली व्यक्ती इतरांना संक्रमित करू शकते.
ताबडतोब कोरोना चाचणी करुन घ्या, टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 5 ते 7 दिवसांनी पुन्हा दुसरी चाचणी करा.
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसली तर ताबडतोब स्वतःला आयसोलेट करा आणि कोरोना चाचणी करुन घ्या. ताप, खोकला, श्वसनाचा त्रास, चव आणि वास घेण्याची क्षमता गमावणे आणि थकवा ही कोविड -19 ची सामान्य लक्षणे आहेत.
प्रत्येकाने मास्क वापरणे जरुरीचे आहे.
लसीचे दोन्ही डोस घेतल्याच्या 2 आठवड्यांनंतर तुम्ही पूर्ण व्हॅक्सिनेटेड होतात.लसीकरणानंतर घरांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका 40% ते 50% पर्यंत कमी होतो.