राजीव सातव यांना कोरोनाची लागण झालेला असून, पुण्यातील जहांगीर रूग्णालयात कोविड उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांना व्हेंटीलेटर लावण्यात आल्यामुळे हिंगोली जिल्हयातील नागरीकांसह राज्यातील त्यांच्या चाहत्यांमधून चिंता व्यक्त केली जाऊ लागली होती.त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
खासदार ॲड. राजीव सातव यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा होऊ लागली असून त्यांना आता इक्मो मशीनवर ठेवण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसल्याचा सल्ला गुरुवारी ता. २९ सायंकाळी झालेल्या तपासणीमध्ये तज्ञ डॉक्टरांनी दिल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.