केंद्रातील मोदी सरकारकडून राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे ठेवण्यात आले आहे.या निर्णयाची घोषणा करताना मोदी म्हणाले की, हा पुरस्कार आपल्या देशातील लोकांच्या भावनांचा आदर करेल. दरम्यान यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी गोंधळत या निर्णयाचे स्वागत केले.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारतीय खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे. सरकारने या पुरस्काराची सुरुवात 1991-92 मध्ये केली होती. विजेत्या खेळाडूला प्रशस्तीपत्र, पुरस्कार आणि 25 लाख रुपये दिले जातात. पहिला खेल रत्न पुरस्कार प्रथम भारतीय ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला होता. आतापर्यंत 45 लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे