गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोनाच्या अतिजलद (RTPCR Test )चाचणीची सुविधा पुरविण्यात आली आहे. या विमानतळावरील कार पार्किंग इमारतीच्या मजल्यावर हि सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे UAE चा प्रवास करणाऱ्या लोकांना या सुविधेचा लाभ घेता येत आहे. या चाचणीची किंमत चार हजार रुपये ठेवण्यात आली आहे. हि चाचणी देशातून बाहेर जाणाऱ्या प्रवाश्याना सहा तास आधी करता येणार आहे.
कोरोनाची अतिजलद चाचणी हि भारत,नेपाळ, नायजेरिया,श्रीलंका,युगांडा या देशाच्या प्रवाश्यांसाठी आहे. आजपासून हि सुविधा गोवा ते दुबई या विमानप्रवास करणाऱ्यांना देण्यात येत असल्याची माहिती गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी दिली आहे.