कोरोना संक्रमणाच्या भयावह परिस्थितीत अनेक लोक,त्यांचे आप्तेष्ट सापडले आहेत. काही लोक बरे होत आहेत तर काहिचा मृत्यू झाला आहे. अनेक लोकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे . यातून गोवेकरांना बाहेर येण्यास मदत म्हणून गोव्यातील मानसिक रोग तज्ज्ञांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देत विनामूल्य सेवा देत आहेत.
कोरोनामुळे अबाल वृद्ध ,गृहिणी, तरुण त्यांच्यावर खूप परिणाम झाला आहे ते जाणवत होते. त्यामुळेच नागरिकांना विनामूल्य सेवा देत आहे. एक तरुण नोकरी गमावल्यामुळे मानसिक तणावाखाली होता. एक गरोदर महिलाही बाळंत होण्यासाठी दवाखान्यात जाण्यास घाबरत होती. तिलाही समजावून सांगून तिची भीती कमी करून रुग्णालयात पाठविले.
काही जणांनी आपल्या जवळची माणसे गमाविल्यामुळे त्या दुःखातून बाहेर पाडण्यासाठी आम्ही मदतीचा हात देत आहोत.यामध्ये येणारे फोन हे अनेक तरुण मुलं-मुलींचे आहेत.काही वेळा तर रुग्णालयाचे बिल भरण्याचेही पैसे नाहीत म्हणून मदतीसाठी फोन येतात तर काही वेळा घरात अन्नाचा कणही नाही म्हणून मदतीसाठी फोन येतात असेही या तज्ज्ञांनी सांगितले.आमच्या एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये लोकांना अशा पद्धतीने हवालदिल झालेले आम्ही पहिल्यांदाच बघत आहोत असेही ते म्हणाले आणि आम्ही शक्य तेवढी मदत करत आहोत असेही सांगितले.