गोवा सरकार राज्यातील ग्रामीण भागांत पर्यटन सुविधा देण्यावर भर देत आहे.यासाठी खेड्याच्या सुधारणा २०२१ अश्या योजनेची स्थापन करत त्यातून खेड्यामध्ये पर्यटकांना आकर्षित होण्यासाठी नवीन बांधकाम आणि तेथील नागरिकांना प्रोत्साहन देत आहे.यातून या नागरिकांना रोजगाराची संधीही प्राप्त होणार आहे.
या योजनेअंतर्गत निवडलेले खेड्यामध्ये ५० लाखांपर्यंत गुंतवणूक करणार असून यामध्ये किवोस्की म्हणजेच गवताच्या झोपड्या,त्यामध्ये हाताने निर्माण केलेल्या वस्तू,स्थानिकांनी बनविलेल्या वस्तू,इंटर्नतची सुविधा,पर्यटकांना राहण्याची सोय अशासारख्या गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. पर्यटन विभाग हा पांडे स्थानिक पंचायतींकडे देणार नसल्याची सांगितले.
हि योजना ‘ आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण योजना ‘ याखाली येत असल्याचे ते म्हणाले. पर्यटनासाठी निवडण्यात येणाऱ्या गावांमध्येही काही त्यांच्या स्वतःच्या नावीन्यपूर्वक गोष्टी असाव्यात असेही ते म्हणाले.यामध्ये त्या त्या गावाचे असलेले नैसर्गिक सौन्दर्या,तिथली गोवन कला,नृत्य,हस्तकला,इतिहासकालीन वास्तू यापैकी काहीतरी असणे आवश्यक आहे.अशा गावाची निवड पर्यटनाच्या या योजनेखाली करण्यात येईल.गावामध्ये काही आवश्यक त्या सुधारणा आणि सोयी या पर्यटन विभागाकडून देण्यात येतील .पण निवड झाल्यानंतर त्या त्या ग्रामपंचायतीला येथे निर्माण करून दिलेल्या सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारी असेल असेही ते म्हणाले.