आमआदमी पार्टीचे मुख्य आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जे लोक खाणीच्या उद्योगावर तसेच पर्यटन उद्योगावर अवलंबून आहेत त्यांना दर महिना ५००० रुपये देण्याचे वचन दिले आहे. कोरोनाकाळापासून जवळजवळ २ वर्ष हे दोन्ही उद्योग बंद आहेत.हि रक्कम जोपर्यंत हे उद्योग पुन्हा चालू हात नाहीत तोपर्यंत दिले जातील असे त्यांनी सांगितले.त्याशिवाय बेरोजगारांनाही ३००० रुपये दर महिना दिले जाईल असेही ते म्हणाले.
गोव्यातील तरुण नवनवीन कौशल्य शिकून आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करू शकतील अशी कौशल्य विद्यापीठ गोव्यामध्ये बनविण्यात येतील असा मांस सांगितलं.केजरीवाल यांनी आपल्या म्हापसातील १००० कार्यकर्त्यांना चांगले काम करण्याचे आवाहन केले. जर २०२२ च्या निवडणुकीत गोव्यातील जनतेने साथ दिली तर दिल्लीसारखेच मॉडेल गोव्यामध्ये राबवू असे त्यांनी सांगितले. मोफत वीज,सुसज्ज्य शाळा ,मोहल्ला दवाखाने यासारख्या सोयी देऊ असेही ते म्हणाले.