गेल्या दोन महिन्यात गोवा सरकारने दोन वेळा एमबीबीएस डॉक्टरांच्या नियुक्त्या काढूनही उमेदवार न मिळाल्यामुळे आता आयुष डॉक्टरांना सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या नियुक्त्या करताना गोव्याचे रहिवासी प्रमाणपत्र हवे ही अटही रद्द करण्यात आली असूनही एमबीबीएस उमेदवारांचे अर्ज आले नाहीत. शेजारील राज्यातून एमबीबीएस उमेदवार मिळतील असे वाटत असतानाही कुणीही अर्ज केले नाहीत.
त्यामुळे आता आम्ही आयुष्य डॉक्टरांची भरती करणार आहोत असे गोवा आरोग्य सेवा संचालक जोस डिसा यांनी सांगितले.कोविडच्या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसची पदे भरणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. त्याशिवाय अनेक डॉक्टर्स निटची तयारी करत आहेत आणि नोकरीला नसलेले असे डॉक्टर्स कमीच आहेत.