गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी सरकारच्या “शासन तुमच्या दारी” योजनेला थिवीम मतदार संघातून सुरुवात केली. यावेळी १५०० नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.यामध्ये स्थानिकांनी निवास प्रमाणपत्र, निवडणूक कार्ड, गृह आधार, सामाजिक कल्याणकारी योजना, वीजजोडणी,उत्पन्न दाखला,नळजोडणी,सरकारी शेतीसंबंधित योजना यासारख्या अडचणींचे समाधान करून घेतले. इथून पुढे सामान्य नागरिकांनी पुढे येऊन सरकारसोबत काम करावे आणि सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.
केंद्रसरकारने १५२ योजना जाहीर केल्या असून त्याचा लोकांनी पुढे येऊन फायदा करून घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.त्यातील १२८ योजना या ऑनलाईन पद्धतीने सुरु केल्या असून आता सरकारी ऑफिसमध्ये जाण्याची गरजही नागरिकांना लागणार नाही असेही सांगितले.
गोव्यातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘सर्वांसाठी सोयी आणि सर्वांसाठी आरोग्य’ ही योजनाही पुन्हा चालू करण्यात आली असल्याचे जाहीर केले.गोव्यातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी गोवा सरकार आणि केंद्र सरकार आपल्या सरकारी अधिकाऱ्यांसोबत काम करत असून नागरिकांनी या सर्व गोष्टींचा फायदा करून घ्यावा असे त्यांनी सांगितले.