गोव्यात भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत

0
210

गोवा विधानसभेच्या एकूण 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान झाले होते. आज, 10 मार्च रोजी मतमोजणी होत आहे. मडगाव आणि पणजी या दोन शहरात मतमोजणी सुरू आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होत असून आम आदमी पक्षाला खाते उघडण्याची संधी मिळाली आहे.

भाजपने गोव्यात मुसंडी मारली आहे. 40 पैकी 18 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 13 जागांवर आहे. मगोप 4 आणि आपला 1 जागांवर आघाडी आहे. 40 पैकी 21 हा बहुमताचा आकडा पार करणारा पक्ष गोव्यात सत्ता स्थापण करू शकणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची लढत होत आहे. बहुतांश एक्झिट पोल्सने काँग्रेसला 15 ते 20 जागा आणि भाजपला 14 ते 18 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु गोव्यात सत्ता स्थापनेचा भाजपने दावा केला आहे.

भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. भाजप 18, काँग्रेस 16 आणि टीएमसी 3 जागांवर आघाडीवर आहेत. सत्तेसाठी 21 जागा आवश्यक असून येथे मगोप किंगमेकर म्हणून पुन्हा उदयास आला आहे.दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून 713 मतांनी पिछाडीवर आहेत. ते म्हणाले, अपक्ष उमेदवार म्हणून चांगली लढत झाली. मी जनतेचे आभार मानतो. लढत समाधानी आहे पण निकाल थोडा निराशाजनक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here