गोव्यात कोरोनाच्या लसीकरणाचा 5 लाखांचा टप्पा ओलांडला असून 95,968 लोकांचे दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे.गोवा सरकारने जास्तीच्या लसी मागविण्यासाठी टेंडरही काढण्यात आले आहे.तसेच भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन या लसीचे २ लाख डॉस खरेदी करणार असून १८-४५ या वयोगटातील ६.५ लाख नागरिकांना हि लास देण्यात येणार आहे.
एका आठवड्यात ३२,८७० कोव्हीशील्डचे डोस पहिल्या गटात देण्यात आले तर दुसऱ्या गटासाठी ३६,५८० डोस जे १८-४४ वयोगटात आहेत अशां लोकांना जूनमध्ये देण्यात येणार आहेत पण हे डोस पुरेसे नाहीत असे सरकारने सांगितले आहे. १८ वयोगटातील जवळजवळ ४.५ लाख नागरिक असून गोवा सरकार केंद्र सरकार काय निर्णय देणार आहे याची वाट बघत आहे