गोव्यातही कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय. त्यामुळे गोव्यात राज्यव्यापी लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. ९ मे ते २३ मे या कालावधीत गोव्यात राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संदर्भात आज(शुक्रवार) घोषणा केली आहे. राज्यात पॉझिटिव्हीटी रेट आणि मृत्यू दर वाढत आहे. राज्यात ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा नाही.
घरगुती सामानांची दुकानं सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच, रेस्टॉरंट सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत टेकअवे ऑर्डर स्वीकारू शकतील. या संदर्भात उद्या विस्तृत आदेश काढला जाईल. उद्या, (शनिवार) सायंकाळी ४ वाजता राज्यस्तरीय कर्फ्यू संदर्भात आदेश जारी केले जातील.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेत मालिका आणि सिनेमाच्या शूटिंगवर बंदी घातली आहे. 10 मेपर्यंत गोव्यात मराठी मालिका आणि रिअॅलिटी शोच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली आहे.