कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरी भागात थैमान घातलेले असताना आता कोरोनाचे संक्रमनग्रामीण भागात पोहचले आहे. त्यातच, ग्रामीण भागात आरोग्य सुविधा नसल्याने अनेकजण शहरी भागाचा रस्ता धरत आहेत. अनेकांचा प्रवासातच मृत्यू होतोय. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव रोखाण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता शहरांसोबत ग्रामीण भागात करोना फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.
नव्या नियमावलीत देखभाल, स्क्रिनिंग आणि आयसोलेशनवर भर देण्यात आला आहे. आशा कार्यकर्त्यांवर आता नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आशा कार्यकर्त्यांना यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य अधिकारी आणि एएनएमला रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात आणि उप केंद्रात हे टेस्ट किट उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्रत्येक गावागावात जाऊन आशा कार्यकर्त्यांना सर्दी तापाची नोंद करावी लागणार आहे. त्यांच्यासोबत सॅनेटायझेशन आणि न्यूट्रिशन कमिटीही सोबत असणार आहे. ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून येतील त्यांना आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना टेस्ट झाल्यानंतर त्यांनी आयसोलेशनमध्येे राहण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आयसोलेशनमध्ये राहावं लागणार आहे.