घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर किंमतीत पुन्हा वाढ

0
150
सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात
सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत पुन्हा वाढली आहे. तेल कंपन्यांनी विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ केली आहे.1 ऑक्टोबर रोजी तेल कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलिंडर 43.5 रुपयांपर्यंत वाढ केली होती.पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढले आहेत.

एलपीजी सिलिंडरची किंमत 884.50 रुपयांवरून 899.50 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. तर 5 किलोचा सिलिंडर आता 502 रुपयांना मिळणार आहे. देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर पार केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here