चक्रीवादळ तौक्ते: नौदलाला समुद्रात बुडालेलया जहाजातील 37 नाविकांचे मृतदेह सापडले

0
120

तौकते चक्रीवादळात मुंबईच्या अरबी समुद्रात बुडालेल्या बार्ज पी ३०५ या जहाजावरील ३७ नाविकांचे मृतदेह सापडले.हे जहाज हिरा ऑइल फिल्ड्सच्या परिसरात बुडाले आहे. हि जागा सुमारे ८० किमी समुद्रात आहे.त्यामुळे नौदल बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.नौदलाने आपल्या अत्याधुनिक, सुसज्ज, पी -81 या विमानांची मदत घेतली आहे. या विमानातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे आकाशातून समुद्राच्या खोलवर भागातील प्रत्येक हालचाल सहजपणे शोधली जाऊ शकते.अजूनही ३३ लोकांचा शोध घेणे चालू आहे.

याबरोबरच इतर तीन जहाज, GAL कंस्ट्रक्टरवर 137 लोक अडकलेले होते, या सर्वांना वाचवण्यात आले आहे. बार्ज SS-3 वर 202 आणि सागर भूषणवर 101 लोक अडकलेले आहेत. नौदलानुसार, हे सर्व लोक सुरक्षित आहेत आणि त्यांना जेवण-पाणी सारख्या गोष्टी पुरवल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here