चौथ्या मजल्यावरुन कोसळून 27 वर्षीय आसामच्या पर्यटकाचा मृत्यू

0
143
चौथ्या मजल्यावरुन कोसळून 27 वर्षीय आसामच्या पर्यटकाचा मृत्यू
चौथ्या मजल्यावरुन कोसळून 27 वर्षीय आसामच्या पर्यटकाचा मृत्यू

चौथ्या मजल्यावरुन कोसळून 27 वर्षीय आसामच्या पर्यटकाचा मृत्यू

म्हापसा:

मित्रांसोबत गोवा ट्रीपसाठी आलेल्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आसामचा २७ वर्षीय पर्यटक वागातोर येथील अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळला. गंभीर जखमी झालेल्या या पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (०५ डिसेंबर) सायंकाळी वागातोर येथे ही घटना घडली.

आयुषमान केशनन (वय २७, रा. आसाम) असे या मृत पर्यटकाचे नाव आहे. आयुषमान त्याच्या इतर दोन मित्रांसोबत मंगळावारी गोव्यात पर्यटनासाठी आला होता. त्याने मित्रांसोबत वागातोर येथे अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. त्याच्यासोबत असणारा एक मित्र नोएडा आणि दुसरा बंगळुरु येथील रहिवासी आहे.

हे पण वाचा जुनाट वीज खांब थेट एसटी बसवर कोसळला

दोन दिवस गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. आयुषमान अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला तत्काळ म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, उपचार सुरु करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.

आयुषमान केशनन याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सोपस्कर पूर्ण उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, हणजूण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. आयुषमान चौथ्या मजल्यावरुन खाली कसा कोसळला याचा तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here