कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनास्थिती हाताळण्याबाबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.यात त्यांनी 5 महत्वाचे सल्ले लिहीले आहेत.
* यूरोप आणि अमेरिकेच्या मोठ्या आरोग्य संस्थांनी ज्या लसींना परवानगी दिली आहे, त्यांना कुठल्याही ट्रायलशिवाय भारतात आणावे आणि भारतातील लसीकरणाचा वेग वाढवावा.* कोणत्या लस निर्मात्यांना किती लसींची ऑर्डर दिली आहे आणि पुढील सहा महिने याची काय स्थिती असेल, हे सरकारने सांगावे.लसीकरण वाढवणे ही करोनाविरोधातील लढय़ातील गुरुकिल्ली आहे. त्यामुळे लसीकरण केलेल्या नागरिकांच्या एकूण संख्येकडे न पाहता एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आले, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही मनमोहन यांनी नमूद केले आहे.* हा लसीकरणाचा कार्यक्रम कसा असेल आणि कोणत्या राज्याला किती लस दिली आहे, हेदेखील सरकारने सांगावे.* ४५ वर्षांपेक्षा कमी वय असले तरीही आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेण्याची मुभा राज्यांना देण्यात यावी* सरकारने लस तयार करणाऱ्या कंपन्यांना काही दिलासा द्यावा.लसीकरण वाढवणे ही करोनाविरोधातील लढय़ातील गुरुकिल्ली आहे.
त्यामुळे लसीकरण केलेल्या नागरिकांच्या एकूण संख्येकडे न पाहता एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आले, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही मनमोहन यांनी नमूद केले आहे.