तरुणांमध्ये झपाट्यानं ‘का’ पसरतो आहे कोरोना ?

0
124

मी सुदृढ आहे, मी रोज व्यायाम करतो, मी मेहनतीने बॉडी कमावली आहे, त्यामुळे मला कोरोनाला घाबरायची गरजच नाही आणि तो माझ्याजवळ येणारही नाही असे बोलणे आणि विचार करणारी तरुणाई आज कोरोनाच्या विळख्याने जखडली जात आहे. इतर ठिकाणी गर्दी आहे. तिथे कोरोना होत नाही. कोरोना होणार नाही याची खात्री कोणीही दिलेली नाही. त्यामुळे मलाही कोरोना होऊ शकतो, हे सर्वच लोकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. मी कितीही सुदृढ असलो करी मला कोरोना संसर्ग होऊ शकतो. याचं कारण, हा विषाणू वय पाहत नाही. नवजात मुलांपासून ते 100 वर्षाचे वृद्ध सर्वांना हा आजार होतो आहे .

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जाणविली नाही एवढी भीषण दाहकता या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने दाखवून दिली आहे. अवघ्या महाराष्ट्राला कोरोनाच्या संसर्गाने जखडले आहे. मुंबई, पुणे, नाशिक नागपूरसारख्य शहरांना विळा घालत कोरोना खेड्यापाड्याकडे निघाला आहे.या दुसऱ्या लाटेतील कोरोना व्हायरस अधिक तीव्रतेने पसरणारा, संसर्ग क्षमता जास्त असलेला आणि रोगप्रतिकारशक्तीला चकवा देत आहे याचे मुख्य कारण त्याने स्वतःच्या संरचनेत केलेला बदल हे आहे. साऊथ आफ्रिका,ब्रीटन आणि ब्राझील यांच्याकडून आलेला हा व्हायरस डबल म्युटेट झालेलाcआहे. त्यामुळे एका व्यक्तीला झालेली बाधा सहजपणे १०-१२ व्यक्तींना आपल्या कवेत घेत आहे.

याची लक्षणेही थोडीफार बदलली आहेत .डोळे लाल होणं, तोंडाला चव नसणं, वास न येणं. त्यासोबत सर्दी, खोकला, ताप, थकवा आणि सांधेदुखी (संधिवात) पोटदुखी, जुलाब अशी लक्षणं दिसत आहेत.कोणताही व्हायरस हा नेहमी स्वतःमध्ये बदल घडवत असतो. या त्याच्या बदलला ‘म्युटेशन’ म्हणतात. गेल्या मार्चमध्ये आलेला हा व्हायरस स्वतःमध्ये बदल घडवून पुन्हा नव्या ताकदीने बाहेर आला आहे. या मधल्या काळात आपण लसीकरण करतच आहोत. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत जेष्ठ व्यक्ती, मधुमेह, उच्च रक्तदाबाने आजारी व्यक्ती, फुफ्फुसं निकामी झालेले किंवा फुफ्फुसांचे आजार असलेल्यांमध्ये कोरोनासंसर्ग जास्त दिसून आला होता.

पण आता ज्यांना कोणताही आजार नाही, जे सुदृढ आहेत, अशा १५ ते ४० वर्षांच्या व्यक्तींमध्ये कोरोनासंसर्गाची लक्षणे जास्त दिसून येत आहेत.लक्षणं दिसून आल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी लोक रुग्णालयात जात आहेत. आजाराचा पहिला दिवस ओळखणं महत्त्वाचं आहे. आजार झाल्यानंतर पाचव्या किंवा सहाव्या दिवसाच्या आधी रुग्णालयात दाखल होणं गरजेचं आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह येईपर्यंत हा वर्ग उपचारांकडे दुर्लक्ष करतोय. रुग्णालयात दाखल होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 20 टक्के रुग्ण तरुण आहेत. त्यांना गंभीर स्वरूपाचा संसर्ग असल्याचं दिसून येत आहे.संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ हा हाच तरुण वर्ग आहे. त्यामुळे काळजी घेणे खूप गरजेचे आहे.आई-वडिलांना आधारही द्यायचा आहे आणि मुलांना मोठं करायचं आहे .त्यासाठी संयम आणि सशक्त रहाणं गरजेचं आहे. मास्क, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगच्या त्रिसूत्रीचं पालन कराल तरच तुम्ही सुरक्षित राहाल आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहील.

कोव्हिड-19 चं दुर्मिळ लक्षण हॅप्पी हायपोक्सिया!यामध्ये शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी असलं तरी श्वास घेण्यास त्रास होत नाही, म्हणून याला ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ असं नाव देण्यात आल आहे. ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ म्हणजे एक गंभीर परिस्थिती आहे. चोरपावलाने हळुहळू शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, कळतही नाही आणि त्याचे परिणाम गंभीर होतात.अचानक शरीरातील ऑक्सिजन 80 टक्क्यांवर पोहोचते तरीही श्वास घेण्यास त्रास होत नाही. सामान्यपणे शरीरातील ऑक्सिजनचा प्रमाण हे ९५-९५% असते.आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. शरीरातील अवयवांपर्यंत हा ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम रक्ताद्वारे केला जाते. मात्र ‘हॅप्पी हायपोक्सिया’मध्ये शरीरातील पेशींना हवं असलेलं ऑक्सिजन रक्ताद्वारे पुरेशा प्रमाणात वाहून नेलं जात नाही.

कोव्हिडमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. रक्तात ऑक्सिजनची योग्य देवाण-घेवाण होत नाही. परिणामी शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावत जाते. पण, याची लक्षणं दिसून येत नसल्याने, कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. लोकांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी असेल तर त्यांच्यावर लगेचच एक्स-रे आणि इतर तपासण्याकरून उपचार करता येतात.

हॅप्पी हायपोक्सिया लक्षणे

* त्वचेचा रंग बदलणं,* गोंधळाची परिस्थिती* कफ, हृदयाचे ठोसे अचानक वाढणं* जोर-जोरात श्वास घेणं* अचानक खूप घाम येणंशरीरातील ऑक्सिजनची पातळी आपल्याला घरबसल्याही मोजता येणं शक्य आहे. ‘पल्स ऑक्सिमीटर’च्या मदतीने आपण सहजतेने शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासू शकतो. कोव्हिडच्या या संसर्गाच्या दिवसात प्रत्येक घरात एक ‘पल्स ऑक्सिमीटर’ असणं गरजेचं आहे. दिवसातून कमीतकमी 10 वेळा तरी आपण आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासली पाहिजे. याशिवाय आता जीव वाचवायचा असेल तर दुसरा पर्याय नाहपण यावेळी असं जाणवलंय की, सुशिक्षित युवा वर्ग बराचकाळ घरी राहातोय. याचं कारण ते काही ब्लड टेस्ट करतायत.

हाय रिझोल्युशन सीटी स्कॅन (HRCT) करतात, तर घरीच RTPCT टेस्ट करून घेतात. खासगी लॅबमध्ये रिपोर्ट येण्यास तीन दिवस लागतात. हे तीन दिवस हानिकारक ठरत आहेत.दुसरीकडे HRCT व्हॅल्यू 5/25 पेक्षा जास्त असलेले युवा बिनधास्त बाहेर फिरत आहेत. या सुशिक्षित लोकांमधील गैरसमज दूर करणं, शक्य होत नाहीये. जे सर्वात महत्त्वाचं आहे.आज जवळजवळ देशात कोरोना येऊन ३९० दिवसांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. हजारो घरांतील काही कुटुंबप्रमुख या आजाराला बळी पडले आहेत. काही कुटुंबाने आपले आई-वडील गमावले आहे. काहींच्या उद्योगावर परिणाम झाला आहे तर काहींना एक दिवसाचं अन्न मिळणे कठीण होऊन बसले आहे. या कोरोनाने सर्व स्थरावरील लोकांना वेगवेगळ्या प्रकारे ग्रासले आहे. आरोग्य कर्मचारी,पोलीस,अंगण वाडी सेविका सगळेच आज गेले दीड वर्ष अहोरात्र झटत आहेत आणि सामान्यांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.हे सर्व लक्षात घेता आपणही थोडा संयम आणि नियमांचे पालन करत कोरोनाशी लढण्यासाठी हातभार लावला तर आपल्या घरात येऊन आपल्या कुटुंबाला विळखा घालण्याची संधी पाहणाऱ्या कोरोनाला आपण बाहेरच थांबवू शकू हीच विनंती !

81People Reached9EngagementsBoost Post

331 ShareLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here