राज्यात कोरोनाची दुसरी लाट हळू हळू ओसरत आहे .त्यामुळे राज्य सरकारने सर्व नियमांचे पालन करुन कोरोनाच्या निर्बंधांना कमी केले जात आहे .घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिर सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे लोकांनी बाहेर पडताना मास्क वापरणे जरुरीचे आहे.कोरोनाला टाळायचे असेल तर कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे .
राज्यात 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत ‘मिशन कवच कुंडल’. मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 15 ऑक्टोबरपर्यंत वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जणार आहे. दसरा आणि दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची तिसऱ्या लाट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असेही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.