⭐पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/ नवी दिल्ली /23 ऑक्टोबर
बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले दाना वादळ 25 ऑक्टोबरला ओडिशा आणि पश्चिम बंगालला धडकणार आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मंगळवारी तामिळनाडू आणि कर्नाटकच्या किनारी जिल्ह्यांमध्ये जोरदार सुरू आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी सकाळी खोल दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले. यानंतर ते पश्चिम बंगालकडे सरकत आहे. बुधवारपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. आयएमडीच्या मते, या कालावधीत वाऱ्याचा वेग 110 किमी/तास ते 120 किमी/ताशी असू शकतो. चक्रीवादळामुळे मच्छिमारांना २५ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-आ-वैभव-नाईकांचे-भाजपला-द/
मात्र, वादळ येण्यापूर्वीच कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. यापूर्वी सोमवारी बंगळुरूला येणारी चार उड्डाणे चेन्नईला वळवण्यात आली होती. याशिवाय, मंगळवारी हवामान खात्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दक्षिण भारतातील पुद्दुचेरी आणि पूर्व भारतातील ओडिशा, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आयएमडीनुसार, आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागात मुसळधार पाऊस आणि 30 ते 50 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुद्दुचेरीमध्ये वीज पडण्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, येलहंका भागात पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे 2000-3000 लोक अडकले आहेत. येथे तीन टीम कार्यरत आहेत. एक टीम दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आली आहे, जिथे 200-300 लोक अडकले आहेत. त्यांना वाचविण्यात यश आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.