देश – फोक्सवॅगन व्हर्च्युसने जीएनसीएपीच्या इतिहासात ५ स्टार सेफ्टी रेटिंग सर्वोत्तम स्कोअर प्राप्त करत मिळविलाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंगकरत मिळविला

0
142
फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडिया फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग
फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडिया फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग

मुंबई फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाने आज अद्ययावत आणि अधिक कडक ग्लोबल एनसीएपी टेस्टिंग प्रोटोकॉल्सअंतर्गत व्हर्च्युअसच्या फाइव्ह स्टार क्रॅश टेस्टचे निकाल जाहीर केले. कारलाइनला प्रौढ तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी रेटिंग देण्यात आले आहे. यामुळे फोक्सवॅगन व्हर्च्युस प्रौढ प्रवासी तसेच लहान मुले अशा दोन्ही विभागांसाठी जीएनसीएपीच्या अद्ययावत क्रॅश टेस्ट प्रोटोकॉलअंतर्गत पूर्ण फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या भारतातील मोजक्या कार्सपैकी एक ठरली आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-विविध-कार्यक्रमांनी-मु/

हे प्रतिष्ठित रेटिंग मिळवणाऱ्या फोक्सवॅगन तैगुन याब्रँडच्या पहिल्या भारत २.० प्रकल्पातील कारसह ही कारही उपलब्ध होणार आहे.

दर्जेदारसुरक्षित आणि चालवण्यास आनंददायी असणाऱ्या कार्स तयार करणे हे ब्रँडचे प्रमुख उद्दिष्ट आहे. फोक्सवॅगन व्हर्च्युसला मिळालेले क्रॅश टेस्ट रिझल्ट्स या तत्वाची पोचपावती देणारे आहे. या निमित्ताने २०२२-२३ मध्ये भारतीय वाहन क्षेत्रातील पब्लिकेशन्सद्वारे १२ पुरस्कार मिळवणाऱ्या या सेदानच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेलेला आहे. या रेटिंगसह व्हर्च्युस या विभागात नवे मापदंड तयार करण्यासाठी तसेच या क्षेत्रात नवा आदर्श घालून देण्यासाठी सज्ज आहे.

फोक्सवॅगन व्हर्च्युसने नुकत्याच मिळवलेल्या या सन्मानाविषयी फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्ता म्हणाले, सुरक्षिततादर्जेदार बांधणी आणि कामगिरी हे जागतिक स्तरावरील फोक्सवॅगनची प्रमुख वैशिष्ट्ये आहे. तैगुननंतर आता व्हर्च्युसनेही ग्लोबल एनसीएपीचे फाइव्ह स्टार रेटिंग मिळवल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हा फोक्सवॅगनसाठी निश्चितपणे मोठा सन्मान असून दर्जा व सुरक्षेच्या मापदंडांचे कसून पालन करण्याच्या ब्रँडच्या बांधिलकीचे निर्देशक आहे. तैगुन तसेच व्हर्च्युसला प्रौढ तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी फाइव्ह स्टार रेटिंग मिळाल्यानंतर आता फोक्सवॅगन भारतात जागतिक पातळीवरील बेस्टसेलर तियागुन व इतर सुरक्षित कार्सची श्रेणी उपलब्ध करून देणार आहे.

टीएसआयची ताकद

आकर्षकउठावदार आणि जर्मन इंजिनियरिंग असलेल्या फोक्सवॅगन व्हर्च्युसला जागतिक पातळीवर नावाजल्या गेलेल्या टीएसआय (टर्बो स्ट्राटीफाइज इंजेक्शन) इंजिनची ताकद मिळालेली आहे. कारलाइनमध्ये आरामदायीपणा, सोयीस्करपणाकनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला असून त्याशिवाय भरपूर जागा व दर्जेदार ड्रायव्हिंग ही तिची खास वैशिष्ट्ये आहेत.

बिग बाय सेफ्टी

फोक्सवॅगन व्हर्च्युसतर्फे ४० पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये दिली जातात व त्यात सहा एयरबॅग्जइलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, मल्टी- कोलायजन ब्रेक्सहिल होल्ड कंट्रोलरियर व्ह्यू कॅमेरारियर फॉग लॅम्प, टायर प्रेशर डिफ्लेशन वॉर्निंगआयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकरेजब्रेक डिस्क वायपिंग यांचा समावेश आहे. या सुरक्षा वैशिष्ट्यांना MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या दणकट बांधणीची जोड मिळाली आहे. अखेरसुरक्षा हा प्रत्येक फोक्सवॅगनचा महत्त्वाचा भाग आहे.

जुलै २०२२ मधअये ग्लोबल एनसीएपीने टेस्टिंगचे नवे नियम तयार केले आहेतजे फ्रंटल ऑफसेटसाइड मोबाइल बॅरीयर आणि पोल साइड इम्पॅक्ट टेस्टसाठी बंधनकारक आहेत. त्याशिवाय कारच्या चाचणी घेतल्या जाणार असलेल्या सर्व व्हेरीएंटमध्ये युएनच्या गरजांप्रमाणे फाइव्ह स्टार रेटिंग मिळवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी) आणि पेडस्ट्रीयन प्रोटेक्शन इक्विपमेंट असणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here