देश-विदेश: आरपीजी ग्रुपच्या ताबीने इंधन कार्यक्षमता आणि वाहन अपटाइम वाढवण्यासाठी लाँच केले ‘कंट्रोल टॉवर’

0
39
आरपीजी ग्रुप ताबी
आरपीजी ग्रुपच्या ताबीने इंधन कार्यक्षमता आणि वाहन अपटाइम वाढवण्यासाठी लाँच केले 'कंट्रोल टॉवर'

अग्रगण्य भारतीय समूह RPG समूहाचा भाग असलेली ताबी मोबिलिटी सातत्याने नवनवीन सोल्युशन्स देत असून कंपनीने त्यांच्या आयओटी, एडीएएस आणि व्हिडीओ टेलिमॅटिक्सच्या सास या प्लॅटफॉर्ममध्ये कंट्रोल टॉवरची भर घातली आहे. १५० हून अधिक ग्राहक आधीच हा उपाय वापरत असून त्यांचे ४५ हजार लिटरहून अधिक इंधन वाचले आहे. त्यांच्या वाहनाची क्षमता ६० हजार किलोमीटरने वाढली आहे. यात ग्राहकांच्या इंधनात ५ टक्के बचत होण्याची हमी आहे.

मुंबई,: लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटसाठी एआय आणि आयओटी समर्थित तंत्रज्ञानातील प्रणेता असलेली ताबी त्याच्या कंट्रोल टॉवर या ग्राउंडब्रेकिंग सोल्यूशनच्या  लॉन्चची घोषणा  करण्यास उत्सुक आहे. हे नवीन सोल्युशन खाण, बांधकाम, टेल्को आणि लॉजिस्टिक उद्योगांमध्ये अभूतपूर्व नियंत्रण आणि वाहतुकीचे ऑप्टिमायझेशन तसेच ऑपरेशनल कामगिरी प्रदान करण्यासाठी अनेक प्रगत तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करते.https://sindhudurgsamachar.in/kokan-सातेरी-माऊली-मंडळ-डिगंणे/

कंट्रोल टॉवर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. त्यात IoT-इंटिग्रेटेड ऑनबोर्ड सेन्सर्स आहेत. अत्याधुनिक निदान टूल्स आहेत. प्रगत डेटा विश्लेषण आणि AI/ML अल्गोरिदमसह अत्याधुनिक तांत्रिक घटकांचा समावेश आहे. हा सर्वसमावेशक संच डेटावर प्रक्रिया करण्यासाठी आणि कृती करण्यायोग्य माहिती देण्यासाठई अखंडपणे कार्य करतो.याव्यतिरिक्त, कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएससह जीओफेन्सिंगच्या माध्यमातून प्रगत व्हिडिओ टेलिमॅटिक्स सिस्टम छोट्यातल्या छोट्या गोष्टींचे हे सोल्युशन रिअल टाइम ट्रॅकिंग करते.

ताबीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पाली त्रिपाठी यांनी त्यांच्या एका मुलाखतीत नमूद केले आहे की“मला वाटते की आम्ही फ्लीट्स, बांधकाम कंपन्या किंवा खाण कंपन्या अशा ग्राहकांशी व्यवहार करतो. हे असे व्यवसाय आहेत जे अगदी थोडक्या मार्जिनवर चालतात. म्हणून आम्ही ROI वर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित करतो. ते ग्राहकांसाठी मिळेपर्यंत आमचे काम संपलेले नसते. ” त्यांनी असेही नमूद केले, “ग्राहकांना सेवा देण्याची, तळागळातील ग्राहकाला सुधारणा करण्यासाठी शिक्षित करण्याची वृत्ती, माझ्या मते हे आमचे वेगळेपण आहे.”

ताबीमध्ये वेगळेपण काय आहे?

●        कंट्रोल टॉवरमुळे वाढीव अपटाइमद्वारे फ्लीट्ससाठी ५-१० कोटी रुपयांचा वाढीव महसूल मिळू शकतो. त्यामुळे ग्राहकांना त्यांचे व्यवसाय वाढविण्यात मदत होऊ शकते.

●        एक समर्पित २४*७ नियंत्रण कक्ष असून त्यात तज्ञ अपटाइम, समस्या निराकरण आणि इश्यू क्लोजर यावर काम केले जाते, त्यामुळे विलंब कमी होतो आणि अपटाइम सुधारते.

●        कंट्रोल टॉवरमुळे मालवाहतुकीतील लोडिंग/अनलोडिंग कालावधी व लागणारा नेमका खर्च याची माहिती देते त्यामुळे त्यांना खर्च अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते आणि त्यामुळे किंमत अधिक चांगली राहते. ही माहिती मिळाल्याने फ्लीट्सना त्यांचे व्यवसाय सुधारण्यास, अधिक फायदेशीर मार्ग/ग्राहक ओळखण्यास आणि त्यांना अधिक व्यवसाय प्रदान करण्यात मदत करू शकते, अशा प्रकारे त्यांच्या तळातील वर्गावरदेखील सकारात्मक परिणाम होतो.

●        वापरण्यास सोपा असून, सिंगल इंटिग्रेटेड आहे. त्यातील सोल्यूशन डॅशबोर्ड संपूर्णपणे OEM आणि वाहन मॉडेल यावर उत्कृष्ट कार्य करते.

यावरील डायनॅमिक डॅशबोर्ड नियंत्रण वापरण्यास सुलभ ग्राफिकल इंटरफेस आहे, त्यामुळे हे तंत्रज्ञान हाताळण्यास सोपे वाटते. अॅप-सारखे डॅशबोर्ड फ्लीट ऑपरेशन्सची रिअल-टाइम माहीती, ऑपरेशनल विश्लेषणे, कामांचे ऑटोमेशन आणि व्यवस्थापन तसेच फ्लीट, इंधन आणि इंजिन कार्यक्षमतेचे तपशीलवार मूल्यांकन यासारख्या गोष्टींची त्वरित माहिती हे कंट्रोल टॉवर देते.

हे तंत्रज्ञान आधुनिक डेटा-संचलित असल्याने खाणकाम आणि बांधकाम व्यवसायांना जटिल समस्यांचे मूळ कारण त्वरित ओळखण्यास मदत होईल. डॅशबोर्ड त्वरित सुधारात्मक कृती करण्यासाठी लगेच माहितीही देईल.

कंट्रोल टॉवर हे फक्त एक टूल नाही तर हा एक परिवर्तनात्मक उपाय आहे. खाण आणि बांधकाम क्षेत्र कसे कार्य करतात हे यातून पुन्हा दिसून येईल. मालवाहतुकीचा वेळेत सुधारणा होईल आणि ते ऑन-टाइम पोहोचेल. ताबी सोल्यूशन केवळ तुमच्या व्यवसायात मूल्य वाढवत नाही तर तुम्हाला तुमच्या ग्राहकांच्या व्यवसायात मूल्य जोडण्यास मदत करते.

या उद्योगांमध्ये कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढवणारे उत्पादन देण्यावर ताबीचा कायम भर राहिला आहे. व्यवस्थापन प्रक्रिया सुव्यवस्थित करून आणि रीअल-टाइम ऑपरेशनल माहिती देवून, आम्ही व्यवसायांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करतो, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजात मोजता येण्याजोग्या सुधारणा होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here