नवी दिल्ली– भारताने चंद्रयान-३, १४ जुलै रोजी लाँच केले. काही दिवसातच चंद्रयान चंद्रयावर लँड करणार आहे, आता ५० वर्षानंतर रशिया ११ ऑगस्ट रोजी चंद्र मोहीम सुरू करण्याची आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणारा पहिला देश बनण्याच्या शर्यतीत सामील होण्याची योजना आखत आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-रत्नागिरी-येथे-महाप्रित/
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा संभाव्य स्त्रोत शोधण्याची शास्त्रज्ञांना फार पूर्वीपासून आशा होती. भविष्यात मानवाला तिथे राहण्यासाठी आवश्यक आहे. या दिशेने संशोधनासाठी भारताने १४ जुलै रोजी प्रक्षेपित केलेल्या चंद्रयान-3 सोबत पुढे सरसावले आहे.
काल भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने म्हटले आहे की, ते २३ ऑगस्टच्या सुमारास चंद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिंग करण्याची योजना आखत आहेत. रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने सांगितले की, त्यांच्या Luna-25 यानाला चंद्रावर जाण्यासाठी पाच दिवस लागतील. Luna-25 नंतर त्याच्या दक्षिण ध्रुवाजवळील तीन संभाव्य लँडिंग साइट्सपैकी एकावर उतरण्यापूर्वी चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ५-७ दिवस घालवेल. भारताचे चंद्रयान 3 आणि रशियाचे यान सोबतच लँड करु शकते.


