देश-विदेश: डॉ. सीताराम जिंदाल यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने  सन्मान

0
59
डॉ. सीताराम जिंदाल,पद्मभूषण पुरस्कार,
डॉ. सीताराम जिंदाल यांचा भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मानाच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मान

डॉ. सीताराम जिंदाल: परोपकार आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील दूरदर्शी व्यक्तिमत्व

नवी दिल्ली, २३ एप्रिल २०२४: परोपकार आणि आरोग्यसेवेतील दूरदर्शी प्रणेते डॉ. सीताराम जिंदाल यांना सोमवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मानाच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा समारंभ म्हणजे डॉ. जिंदाल यांच्या समाजाप्रती अतुलनीय योगदानाची दखल घेणारा एक महत्त्वाचा प्रसंग होता. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-सुवर्णजयंतीच्/

हरियाणातील नलवा या शांत गावात १२ सप्टेंबर १९३२ रोजी जन्मलेल्या डॉ. सीताराम जिंदाल यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. जिंदाल ॲल्युमिनियम लिमिटेड (जेएएल) चे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांचे  उद्योजकीय कुशाग्र कौशल्य भारतातील सर्वात मोठे ॲल्युमिनियम निर्माण उत्पादक म्हणून घडविण्यात  मोलाचे ठरले आहे. असे असूनही त्यांचा दृष्टीकोन व्यवसायाच्या पलीकडे जाणारा आहे. त्यांच्या योगदानातून  एस. जिंदाल चॅरिटेबल फाऊंडेशन, असंख्य ट्रस्ट, रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालये यांची स्थापना झाली असून त्यातून कल्याणकारी सेवांप्रती असलेली त्यांची अतूट बांधिलकी दिसून येते.

डॉ. जिंदाल यांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे ते कलकत्ता विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी १९५७ मध्ये बॅचलर पदवी मिळवली. त्यानंतर निसर्गोपचारात डॉक्टरेट मिळवली. महाविद्यालयीन जीवनात एक जीवन बदलवून  टाकणारा अनुभव त्यांना आला. उपवास, एनीमा आणि योगा यांच्या मदतीने पोटाच्या क्षयरोगाच्या वरकरणी बरी होऊच शकणार नाही अशा परीस्थितीवर त्यांनी मात केली. त्यातून विनाऔषध उपचार याविषयी त्यांची जिज्ञासा वाढली. याच उत्कटतेतून १९७९ मध्ये बंगलोरमध्ये जिंदाल नेचरक्युअर इन्स्टिट्यूट (JNI) ची स्थापना करण्यात आली. या संस्थेने तीव्र आणि जुनाट आजारांवर उपचार करण्याच्या मानवतावादी दृष्टिकोनासाठी जागतिक ख्याती मिळवली. त्या वेळी प्रचलित असलेल्या पारंपरिक निसर्गोपचार उपचारांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने डॉ. जिंदाल यांनी या दुर्लक्षित असलेल्या  शास्त्राचे आधुनिकीकरण आणि नवीनीकरण करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली.

डॉ. जिंदाल यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, जेएनआय हे दमा आणि मधुमेहापासून ते संधिवात आणि अगदी कर्करोगाच्या काही विशिष्ट आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठीचे एक जागतिक दर्जाचे  सुविधा केंद्र बनले  आहे. संपूर्ण वर्षभर ५५० बेड्स असलेली ही संस्था जगभरात औषधमुक्त उपचार पर्याय शोधणाऱ्यांसाठी आशेचा किरण म्हणून काम करत आहे. डॉ. जिंदाल यांचे महत्त्वपूर्ण योगदान ‘डिटॉक्सिफिकेशन’ च्या नावीन्यपूर्णतेत आणि ही उपचार पद्धती सादर करण्यात आहे. ‘डिटॉक्सिफिकेशन’ ही एक अत्यंत प्रभावी औषधविरहित प्रक्रिया आहे जी वैज्ञानिकदृष्ट्या आणि सुरक्षितपणे शरीरातील विविध यंत्रणा प्रणाली स्वच्छ करते. या नवीन उपचार पद्धतीने प्रतिबंधात्मक काळजी, प्रतिबंध आणि अनेक रोग बरे करण्यामध्ये क्रांती घडवून आणली आहे.

डॉ. जिंदाल यांना माजी पंतप्रधान जसे की श्री. अटलबिहारी वाजपेयी, श्री. चंद्रशेखर, श्री आय. के. गुजराल, श्री. देव लालजी, श्री. रामकृष्ण हेगडे, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि अनेक महत्वपूर्ण/मान्यवर व्यक्तीकडून प्रशंसा लाभली आहे. जेएनआय मध्ये रुग्ण म्हणून त्यांचे वैयक्तिक अनुभव डॉ. जिंदाल यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा परिवर्तनीय प्रभाव अधोरेखित करतात.

जेएएलच्या भरघोस निधीद्वारे समर्थित एस. जिंदाल चॅरिटेबल फाऊंडेशन म्हणजे डॉ. जिंदाल यांच्या परोपकार, सर्वांचे कल्याण याप्रति असलेल्या अतूट बांधिलकीची पावती आहे. फाउंडेशन हे त्यांच्या  धर्मादाय उपक्रमांसाठी आर्थिक आधारस्तंभ असून बाह्य पाठबळ न घेता विविध ट्रस्ट, रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालयांना मदत करत आहे. डॉ. जिंदाल यांचे समाजकल्याणासाठीचे समर्पण हे त्यांनी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून हजारो वंचित विद्यार्थ्यांना केलेली मदत आणि समाजातील वंचित घटकांची सेवा करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या असंख्य स्वयंसेवी संस्थांना दिलेल्या पाठबळातून दिसून येते.

निसर्गोपचार ॲलोपॅथिक रुग्णालयांवरील भार कमी करू शकतात आणि जागतिक स्तरावर लाखो लोकांचे जीवन त्यामुळे बदलू शकते यावर डॉ. जिंदाल यांचा विश्वास असून प्रतिबंधात्मक काळजी  याप्रति असलेली त्यांची बांधिलकी या विश्वासाशी सुसंगत आहे. डॉ. जिंदाल यांचे महत्त्वपूर्ण योगदान आरोग्यसेवा आणि परोपकाराच्या पलीकडे जाणारे आहे. विशेषत: सरकारद्वारे कॉर्पोरेट सोशल  रिस्पॉन्सिबिलिटीज (CSR) योजना सुरू करण्यात त्यांची भूमिका मोलाची आहे. त्यांचे गेल्या १५ वर्षांपासूनचे अथक प्रयत्न आणि टक्केवारी वाढवण्यासाठी सुरू असलेली धडपड, सामाजिक  उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांवर प्रकाश टाकतात.

थोडक्यात सांगायचे झाल्यास, डॉ. सीताराम जिंदाल यांच्या आरोग्यसेवा, परोपकार आणि सामाजिक सुधारणांमध्ये अतुलनीय योगदानामुळे भारताच्या इतिहासातील ते एक सन्माननीय व्यक्तिमत्त्व बनले आहेत. नाव, प्रसिद्धी, पद आणि संपत्ती गोळा करण्याची आस त्यांना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here