देशात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब वाढण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बीपीसीएल ३१ मार्च २०२३ पर्यंत २०० राष्ट्रीय महामार्गांना, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जलद इव्ही चार्जिंग स्टेशनसह कव्हर करणार आहे.
· ७५० किमी लांबीच्या दिल्ली-जालंधर-दिल्ली या महामार्गावर धोरणात्मक दृष्टीने स्थित १२ बीपीसीएल इंधन केंद्रांवर ३० केडब्ल्यू (kW) पासून चालू होणारे सीसीएस-२ फास्ट चार्जर्स लावले आहेत.
· बीपीसीएलचे त्यांच्या ७००० पारंपरिक रिटेल आउटलेटना अनेक इंधन पर्याय प्रदान करणाऱ्या ऊर्जा केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट आहे
नवी दिल्ली : भारताचे एक ‘महारत्न’ आणि फॉरच्यून ग्लोबल ५०० कंपनी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ने आज दिल्ली-जालंधर महामार्गावरील (एनएच-४४ चा एक भाग) धोरणात्मक दृष्टीने स्थित १२ बीपीसीएल इंधन केंद्रांवर इलेक्ट्रिक वाहन मालकांची रेंजची काळजी दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याचा एक भाग म्हणून इव्ही चार्जिंग हाय कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा केली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-स्विच-इआयव्ही-२२-switch-eiv-२/
एनएच-४४ चा ७५० किमी लांबीचा हा भाग देशातील चौथा इलेक्ट्रिक वाहन जलद चार्जिंग कॉरिडॉर आहे, जिथे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना अंदाजे प्रत्येकी १०० किमी अंतरावर जलद चार्जिंग स्टेशन आहेत. या आधी, चेन्नई-त्रिची-मदुरई, चेन्नई-बंगळूर आणि बंगळूर-कूर्ग हे बीपीसीएलद्वारे स्थापित केलेले पहिले तीन इलेक्ट्रिक वाहन जलद चार्जिंग कॉरिडॉर आहेत.
बीपीसीएल इंधन केंद्रावरील इलेक्ट्रिक वाहन फास्ट चार्जर ग्राहकांना १२५ किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळण्यासाठी त्यांचे इलेक्ट्रिक वाहन केवळ ३० मिनिटांमध्ये रिचार्ज करण्यास मदत करेल आणि त्यानंतर पुढे जाऊन इव्ही मालकांसाठी आणखी दुसरे बीपीसीएल इलेक्ट्रिक वाहन जलद चार्जिंग केंद्र असेल. सर्व इव्ही ग्राहक प्रती वापराप्रमाणे पैसे द्या (पे पर यूज) ऑनलाइन सेवेद्वारे इलेक्ट्रिक वाहन जलद चार्जिंग केंद्र वापरू शकतील. फास्ट चार्जर हे अन्य कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय स्वतः वापरता येईल, तथापि गरज पडल्यास केंद्रावर सहाय्यता करायला कर्मचारी उपस्थित असतील.
बीपीसीएल इंधन केंद्रांवर स्थित ही इव्ही जलद चार्जिंग केंद्रे लांब पल्ल्याच्या आणि शहरांतर्गत प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांचे वाहन रिचार्ज होईपर्यंत अत्यंत आवश्यक असणारे स्वच्छ व आरोग्यदायी शौचालये, एम एटीएम (mATM) यांच्यासारख्या सुविधांसह सुरक्षित, सुप्रकाशित व सुसज्ज अशी थांबण्यास जागा उपलब्ध करून देतात. त्रासमुक्त व पारदर्शक ऑनलाइन वापरकर्ता अनुभवासाठी बीपीसीएलने हॅलो बीपीसीएल (HelloBPCL) अॅपद्वारे संपूर्ण इव्ही चार्जर लोकेटर, चार्जर ऑपरेशन्स आणि ट्रान्सॅक्शन प्रक्रियेचे डिजिटायझेशन केले आहे.
‘क्लीन.फास्ट.ईझी’ या ब्रीद वाक्याला पुढे नेणाऱ्या ब्रॅंड च्या या इ-ड्राइव्हच्या अंतर्गत बीपीसीएल भारतात इलेक्ट्रिक वाहनांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी, देशात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब वाढविण्यासाठी आणि त्यास पाठिंबा व प्रोत्साहन देण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत २०० राष्ट्रीय महामार्गांच्या बाजूला असे जलद इव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.
बीपीसीएलने एमजी मोटर्स या ब्रिटिश ऑटोमोटिव्ह ब्रॅंड, ज्यांनी आतापर्यंत देशात ८९०० इलेक्ट्रिक वाहने विकली आहेत, सोबत एकात्मिक ग्राहक कार्यक्रम देखील सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे सर्व एमजी इलेक्ट्रिक वाहनांच्या ग्राहकांना त्यांच्या कारच्या डॅशबोर्डच्या सहाय्याने गाडी चालवत असतानाच बीपीसीएल इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन शोधणे शक्य होईल आणि त्यांना देशभरातील सर्व बीपीसीएल इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रांवर खास एमजी इव्ही मालकांसाठी दिलेल्या विशिष्ट फायद्यांसह त्यांची वाहने जलद रिचार्ज करता येतील.
बीपीसीएलच्या रिटेल इनिशिएटिव्ह्ज आणि ब्रॅंड चे प्रमुख श्री. शुभंकर सेन आणि एमजी मोटर्स चे मुख्य कमर्शिअल ऑफिसर श्री. गौरव गुप्ता यांनी उत्तर बीपीसीएलचे रिटेल प्रमुख श्री. राजीव दत्ता, बीपीसीएलच्या दिल्ली, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचे प्रमुख श्री. मिहिर जोशी आणि अन्य वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत ११ फेब्रुवारी २०२३ रोजी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात संयुक्तपणे बीपीसीएल आणि एमजी मोटर्सच्या सहभागीदारीमध्ये सुरू होत असलेल्या एकात्मिक ग्राहक कार्यक्रमाची घोषणा केली.
उद्घाटनाच्या वेळी बीपीसीएलच्या रिटेल इनिशिएटिव्ह्ज आणि ब्रॅंड चे प्रमुख श्री. शुभंकर सेन म्हणाले,“अधिक स्वच्छ व हरित पृथ्वी प्रत्येकासाठी जास्त उत्तम आहे आणि डिकार्बनायझेशन हे एक असे आव्हान आहे ज्यासाठी व्यापक व बहुआयामी उपायांची आवश्यकता आहे. आम्ही बीपीसीएल इलेक्ट्रिक वाहन मालकांच्या रेंज, वेळ आणि चार्जिंग स्टेशन शोधणे या समस्यांच्या काळजीला संबोधित करण्यासाठी महामार्ग कॉरिडॉर मध्ये इलेक्ट्रिक वाहन जलद चार्जिंग केंद्रांचे नेटवर्क उभारून आमची भूमिका बजावत आहोत आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की , यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करणे अधिक जलद गतीने वाढेल. एमजी मोटर्स इव्ही ग्राहकांना एक लाभदायक अनुभव देण्यासाठी आज एमजी मोटर इंडिया सोबतचा आमचा हा पुढाकार म्हणजे आमच्या इव्ही चार्जिंग धोरणांतर्गत आणि २०४० पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाचे आमचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम आहे. एमजी मोटर्स सोबत आमच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या एकात्मतेबद्दल आम्ही उत्साही आहोत, ज्यांनी एमजी इव्ही मालकांसाठी अतुलनीय सुविधा प्रदान करणाऱ्या डॅश बोर्ड नेव्हिगेटर मध्ये आमचे इव्ही चार्जिंग नेटवर्क समाविष्ट केले आहे. हे खरोखरच देशात इव्ही वाहनांचा प्रसार व्हावा म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी आम्हा दोन्ही संस्थांची वचनबद्धता प्रतिबिंबीत करते. एमजी मोटर इंडिया सोबत आम्ही देशातील शहरे, पर्यटन स्थळे आणि आर्थिक केंद्रांना जोडणाऱ्या प्रमुख प्रवासी मार्गांसोबत इव्ही चार्जिंगचा अनुभव सुधारण्यासाठी काम करणार आहोत.”
भारत पेट्रोलियम इंधन केंद्रे ग्राहकांना स्वच्छ व आरोग्यदायी सुलभ शौचालये, रोख पैसे काढण्यासाठी एटीएम सेवा, गाडी चार्ज करताना सुरक्षित पार्किंग व्यवस्था, मोफत डिजिटल हवा भरण्याची सुविधा, २४ तास कामकाज आणि अशा बऱ्याच सुविधा प्रदान करतात. काही इंधन केंद्रांमध्ये नायट्रोजन भरण्याची सुविधादेखील आहे. भारत पेट्रॉलियमच्या बऱ्याच महामार्ग इंधन केंद्रांवर ए२बी, मॅकडोनाल्ड्स, क्यूब स्टॉप, कॅफे कॉफी डे आणि इतर स्थानिक आउटलेट्स यांसारख्या आघाडीच्या ब्रॅंड्स सोबतच्या धोरणात्मक युतीद्वारे स्वच्छ व आरोग्यास उत्तम असे खाद्यपदार्थ देखील उपलब्ध आहेत. भारत पेट्रॉलियमने आपल्या ग्राहकांच्या अधिक सोयीसाठी महामार्गावरील प्रमुख इंधन केंद्रांवर आपल्या इन आणि आउट सुविधा स्टोर्सची साखळी सुरू करण्याची योजना आखली आहे.
एमजी मोटर्स चे मुख्य कमर्शिअल ऑफिसर (सीसीओ) श्री. गौरव गुप्ता या प्रसंगी बोलताना म्हणाले, “साल २०२० मध्ये झेडएस इव्ही बाजारात आल्यापासून एक मजबूत इव्ही इकोसिस्टम विकसित करण्यात एमजी मोटर्स आघाडीवर आहे. बीपीसीएलच्या भागीदारीत देशातील सर्वात महत्त्वाच्या महामार्गावर बारा नवीन डिसी (DC) फास्ट चार्जिंग सुविधांच्या उद्घाटनाची घोषणा करताना आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. इव्ही च्या अवलंबनाला गती देण्यासाठी भारतात सर्वांगीण परिसंस्थेची स्थापन करण्याचा आमचा मानस आहे आणि बीपीसीएल इंधन केंद्रावरील नवीन चार्जर्स लोकांना इलेक्ट्रिक मोबिलिटी कडे जाण्यासाठी आवश्यक प्रेरणा प्रदान करतील.”