देश : सैन्यदलाच्या संघावर मात करत वायू दलाच्या संघाने जिंकला आर्म्ड फोर्स सायकल पोलो कप २०२३

0
33
सैन्यदलाच्या संघावर मात करत वायू दलाच्या संघाने जिंकला आर्म्ड फोर्स सायकल पोलो कप २०२३
पोलो फेडरेशन इंडियाचे श्री. गजानन बुर्डे यांच्या हस्ते विजेत्यांना चषक प्रदान करण्यात आला. यावेळेस मेजर जनरल एआरएस काहलॉन, व्हीएसएम आणि उडचलोचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

अहमदनगर – उडचलोतर्फे प्रायोजित करण्यात आलेल्या आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो कप २०२३ ची सांगता २१ मार्च २०२३ रोजी झाली. यावेळेस भारतीय वायू दल आणि आर्म्ड कॉर्प्स यांच्यात थरारक अंतिम सामना पाहायला मिळाला. वायू दलाच्या टीमने आर्म्ड कॉर्प्सवर १९-४ ने मात करत चषक जिंकला. या तीन दिवसीय स्पर्धेमध्ये टेरिटोरियल आर्मीभारतीय सैन्यदल आणि भारतीय वायू दल यांच्यात तुल्यबळ स्पर्धा पाहायला मिळाली. सायकल पोलो फेडरेशन इंडियाचे श्री. गजानन बुर्डे यांच्या हस्ते विजेत्यांना चषक प्रदान करण्यात आला. यावेळेस मेजर जनरल एआरएस काहलॉनव्हीएसएम आणि उडचलोचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-चैत्रचाहूल-रंग/

सायकल पोलो फेडरेशन इंडियातर्फे आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो कपचे आयोजन करण्यात आले होते. सैन्य दलाच्या सर्वोत्तम कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी व आगामी वर्ल्ड बायसिकल पोलो चॅम्पियनशीपसाठी तयारी करण्यासाठी हे आयोजन केले जाते. यावर्षी विजेत्या संघाला १.५ लाख रुपये आणि उडचलो आर्म्ड फोर्स पोलो सायकल ट्रॉफी देण्यात आली. या सामन्यील निवडक खेळाडूंना जागतिक चॅम्पियनशीपसाठी भारतीय संघात स्थान दिले जाणार आहे. दर चार वर्षांनी वर्ल्ड कप फॉर बायसियकल पोलो चॅम्पियनशीपचे आयोजन केले जाते व त्याचा यापूर्वीचा सामना २०१९ मध्ये अर्जेंटिना येथे झाला होता. भारताने आतापर्यंत ८ सायकल पोलो वर्ल्ड कपमध्ये भाग घेतला असून ६ सुवर्ण आणि २ कांस्य पदके जिंकत जागतिक आघाडी राखलेली आहे.

विजेत्या वायू दलाच्या संघाचे कर्णघार जेडब्ल्यूओ विष्णू एस म्हणाले, ‘सर्व सामन्यांत, विशेषतः अंतिम सामन्यात टीमने केलेल्या कामगिरीचा आम्हाला आनंद वाटतो. वर्ल्ड चॅम्पियनशीप ट्रॉफी मिळवण्यासाठी सज्ज असलेल्या भारतीय संघाचा भाग होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो कप २०२३ चे इव्हेंट मॅनेजर लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू म्हणाले, यावर्षी झालेल्या स्पर्धेतील सामन्यांमध्ये काही खेळाडूंची असामान्य कामगिरी पाहायला मिळाली. सर्व संघ आणि खेळाडूंबरोबर काम करणे आनंददायी होते. त्यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेत खिलाडीवृत्ती आणि कौशल्याचे प्रदर्शन पाहायला मिळाले. भारतात सायकल पोलो खेळाचा प्रसार करण्याचे काम यापुढेही आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि म्हणूनच जगभरातील चाहत्यांसाठी अशाप्रकारच्या आकर्षक स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.

सायकल पोलो फेडरेशन इंडियाचे प्रमुख अधिकारी श्री केके सोनी म्हणाले, सायकल पोलो हा वेगवान, जबरदस्त उर्जेची गरज असणारा खेळ आहेज्यामध्ये हॉर्स पोलोसाठी लागणारी चपळाई व सायकलिंगचा वेग आणि तीव्रता यांचा मेळ  घातला जातो. हा एक आकर्षकप्रचंड शारीरिक ताकदकौशल्यअचूकता आणि संघभावना यांची गरज असलेला खेळ आहे. अहमदनगरमध्ये या खेळाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे. आम्ही आपल्या देशात या खेळाचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असून हा सीझन यशस्वी करण्यासाठी उत्सुक आहोत. मी विजेत्या संघाचे अभिनंदन करतो.

उडचलोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी कुमार म्हणाले, लोकांना एकत्र आणू शकण्याची खेळाची ताकद पाहाणे हा असामान्य अनुभव आहे. आर्म्ड फोर्स सायकल पोलो कप २०२३ एक अविस्मरणीय अनुभव होता आणि त्याचा भाग झाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. सहभागी झालेले सर्व संघ आणि खेळाडूंचे तसेच लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू व त्यांच्या सहकाऱ्यांचे चोख आयोजनाबद्दल अभिनंदन करतो.

१९ ते २१ मार्च २०२३ दरम्यान झालेल्या या तीन दिवसीय तिहेरी स्पर्धेत एकूण सात सामने खेळले गेले. संघांचे नेतृत्व प्रसिद्ध सायकलिस्ट जेडब्ल्यूओ विष्णू एस, एलडी पियुष कुमार सिन्हा आणि सेप सानोफार यांनी केले. भारतात केवळ संरक्षण दलांना सेवा देणारी आघाडीची कनझ्युमर टेक प्रा. लि. कंपनी उडचलो कंपनी आर्म्ड फोर्सेस सायकल पोलो कप २०२३ ची अधिकृत प्रायोजक होती. सैनिकांचे आयुष्य सोपे करण्याच्या तत्वासह उडचलो अविरतपणे काम करत आहे. या सहकार्याच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सायकल पोलो या खेळाचा समावेश करण्याचे उद्दिष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here