देशभरातील करोना संसर्गाची तिसरी लाट आल्याची चिन्हे दिसत आहेत दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. याशिवाय करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रूग्णही आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही दररोज भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून करोना संसर्गाचा अधिक प्रमाणात प्रसार झालेल्या राज्यांना विशेष सूचना देखील दिल्या गेल्या आहेत.
मागील २४ तासांमध्ये देशभरात अडीच लाखांहून जास्त म्हणजे २ लाख ६४ हजार २०२ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही संख्या कालच्या रूग्ण संख्येच्या तुलनेत ६.७ टक्के अधिक आहे. याशिवाय ५ हजार ७५३ ओमायक्रॉनबाधितही आढळलेले आहेत.सेच, मागील २४ तासांमध्ये देशभरात १ लाख ९ हजार ३४५ रूग्ण करोनामुक्त देखील झाल्याचे समोर आले आहे. सध्या देशात १२ लाख ७२ हजार ७३ अॅक्टीव्ह केसेस असून, पॉझिटिव्हिटी रेट १४.७८ टक्के आहेया. शिवाय देशात मागील २४ तासात ३१५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झालेला असून, आजपर्यंत एकूण ४,८५,३५० करोनाबाधित रूग्णांचा देशभरात मृत्यू झालेला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.