दोन दिवसात पुन्हा थंडीची लाट येणार

0
80

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 3-4 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात थंडीची लाट कायम राहणार आहे. तर आज, रात्री आणि उद्या सकाळी हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते कमी होईल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.पुढील दोन दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.दोन दिवसात पुन्हा थंडीची लाट येणार असल्याने आणखीणच कडाक्याची थंडी पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

दिल्लीसह संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात आणि पुढील चार-पाच दिवसांत मध्य प्रदेशात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here