नवी मुंबईत प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेची मोठी मोहीम सुरू
नवी मुंबई : शहरातील वाढत्या हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने व्यापक स्तरावर विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांची डीप क्लिनिंग, मिस्ट स्प्रेइंग यांसारखे तात्काळ परिणामकारक उपक्रम राबवले जात असून बांधकामस्थळे आणि RMC प्लान्ट्सची नियमित व काटेकोर तपासणी सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हे पण वाचा रायगड जिल्ह्यात 70.26 टक्के मतदान; माथेरान आघाडीवर, पेण व रोहा उत्साही प्रतिसाद
महापालिकेने नागरिकांनाही प्रदूषण नियंत्रणाच्या मोहिमेत सक्रिय सहभागाचे आवाहन केले आहे. कचऱ्याचे योग्य विभाजन, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, हरित इंधनांची निवड, कचरा जाळण्याचे टाळणे आणि बांधकाम नियमांचे पालन या सवयी अंगीकारल्यास शहर अधिक स्वच्छ व निरोगी बनू शकते, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
नवी मुंबईला प्रदूषणमुक्त शहर बनवण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे अत्यावश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


