पंतप्रधान मोदींनी केले यू-विन पोर्टलचे लोकार्पण!

0
23
यू-विन पोर्टल,
पंतप्रधान मोदींनी केले यू-विन पोर्टलचे लोकार्पण!

⭐गर्भवती महिला, मुलांच्या लसीकरणाचा डिजिटल रेकॉर्ड

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/नवी दिल्ली/30 ऑक्टोबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धन्वंतरी जयंती आणि नवव्या आयुर्वेदिक दिनाचे औचित्य साधून देशवासीयांना दिवाळीची महत्त्वाची भेट दिली आहे. मोदी यांनी मंगळवारी आरोग्य क्षेत्राशी संबंधित १२,८५० कोटी रुपयांच्या अनेक योजनांचे लोकार्पण आणि शिलान्यास केला. यावेळी त्यांनी आरोग्य सेवा आणखी सुलभ करण्यासाठी यू-विन पोर्टलचा शुभारंभ केला. या पोर्टलमध्ये गर्भवर्ती महिला आणि लहान मुलांच्या लसीकरणाची संपूर्ण माहिती आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-देवबाग-सरपंच-उपसरपंच-यां/

मोदी यांनी राजधानी दिल्लीत देशातील पहिल्या अ. भा. आयुर्वेदिक संस्थेचे लोकार्पण केले. यात पंचकर्म रुग्णालय, आयुर्वेदिक फार्मसी, स्पोर्ट्स मेडिकल युनिट, मध्यवर्ती ग्रंथालय आणि ५०० लोकांची आसनव्यवस्था असलेल्या ऑडिटोरियमचा समावेश आहे. ‘यू-विन’ पोर्टलला नियमित लसीकरण, इ-रजिस्ट्रेशन आणि रिकॉर्ड ठेवण्यासाठी विशेष करून विकसित करण्यात आले आहे. हे पोर्टल सध्या पायलट आधारावर संचालित केले जात होते. आता ते राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्यात आले आहे. हे पोर्टल को-विन प्रमाणेच काम करणार आहे.

यू-विन’ पोर्टलचे फायदे
या पोर्टलचा उद्देश नियमित लसीकरणाची इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्री तयार करणे आहे. हे पोर्टल लसीकरण प्रक्रियेला पूर्णपणे डिजिटल बनवेल. गर्भवती महिला तसेच लहान मुलांना त्याचा विशेष लाभ होणार या पोर्टलच्या माध्यमातून सर्व गर्भवती महिला आणि जन्मापासून १६ वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलांना विविध आजारांवर दिल्या जाणार्‍या जीवनरक्षक लसी वेळेच्या आत देणे निश्चित करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here