ओरोस येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे झाले उदघाटन;आ. वैभव नाईक यांनी जिल्हा पत्रकार संघाला दिल्या शुभेच्छा
प्रतिनिधी: पांडुशेठ साठम
ओरोस येथे भव्य दिव्य असे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवन उभारण्यात आले असून आज त्याचा उदघाटन समारंभ पार पडला. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आचरा-येथे-शिवसेनेच्या-व/
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाचे भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर व माझ्या हस्ते झाले आणि आता याच्या उदघाटन समारंभाला देखील उपस्थित राहण्याची संधी लाभली याचा आपल्याला आनंद आहे.या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची स्वप्नपूर्ती झाल्याचा आ. वैभव नाईक यांनी उल्लेख करत सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, कार्यकारिणी सदस्य महेश सरनाईक, संतोष राऊळ आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.


