पीएम किसान योजनेंतर्गत 10व्या हप्त्याचे 15 डिसेंबरपर्यंत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवू शकते. पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये पाठवरे जातात.यावेळी ही रक्कम काही शेतकऱ्यांना दुप्पट दिली जाणार आहे अशी सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत देशभरातील 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1,58 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. दोन हजार रुपयांचा दहावा हप्ता यावेळीही शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार असला तरी काही शेतकऱ्यांसाठी ही रक्कम दुप्पट होऊ शकते असा दावा अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.