पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी घेतला. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. शनिवार आणि रविवार सर्व दुकाने बंद राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी होणारी गर्दी पाहता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फ़ैलाव सुरु होण्यास वेळ लागणार नाही यामुळे हा नियनय घेण्यात आणल्याचे सांगण्यात आले आहे.
अजित पवारांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अजून कठोर निर्बंध लावण्याचा इशाराही पुणेकरांना दिला आहे. यासोबतच विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच पर्यटनस्थळांवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.त्यामुळे पुणे जिल्ह्यात पर्यटकांच्या गर्दीला चाप बसणार आहे.
केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात येईल. ग्रामीण भागातही हे नियम लागू असणार आहे असे पालकमंत्र्यांनी सांगितले. परिस्थिती नियंत्रणात आली तर नियमात बदल केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.