पुणे: पुण्यात येरवडा परिसरात एक मॉल बांधला जात होता. त्याच्या तळघरातील लोखंडी स्लॅब कोसळला.या मॉलच्या बांधकामादरम्यान लोखंडी स्लॅब कोसळल्यामुळे 7 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी आहेत. इतर काहीजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बांधकाम करताना जी खबरदारी घ्यायला हवी होती ती घेतली गेली नसल्यामुळे हि घटना घडली असावी असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मृत्युमुखी पडलेले बहुतांश मजूर हे बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीनी ट्विट करून मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे.