२० एप्रिल २०२३: वैदिक साहित्य, तत्त्वज्ञान, पौराणिक कथा आणि धार्मिक विधींसंदर्भातील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. मत्तूर नंदकुमारा यांची शिक्षण, कार्यप्रदर्शन आणि यूकेमध्ये भारतीय अभिजात कलेला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी केलेल्या सेवांच्या सन्मानार्थ मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर (एमबीई)चे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ यूके आणि युरोपमध्ये संस्कृत शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार केला आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्र-मंदिर-महास/
डॉ. नंदकुमारा हे सध्या लंडन, यूके येथील भारतीय विद्या भवन (ज्याला द भवन म्हणूनही ओळखले जाते) चे कार्यकारी संचालक असून भारताच्या कला, संस्कृती आणि तत्वज्ञानाचे राजदूत म्हणून त्यांची भूमिका यूकेच्या आघाडीच्या १०० सर्वाधिक प्रभावशाली आशियाई व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
१९७७ पासून डॉ. नंदकुमारा लंडनमधील द भवनशी निगडीत असून तिथे ते व्याकरण, भाष्य आणि महान साहित्यिक ग्रंथांवरील चर्चा यामधील प्रारंभीक अभ्यासापासून तज्ञ-स्तरीय अभ्यासक्रमांपर्यंतचे अनेक संस्कृत अभ्यासक्रम शिकवत आहेत. गेल्या पाच दशकांमध्ये, लंडनमधील द भवन हे त्याच्या यशात योगदान दिलेल्या असंख्य शुभचिंतकांच्या मदतीने एक गतिशील आणि तेजस्वी सांस्कृतिक केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे, श्रीमती सुधा मूर्ती २००८ पासून द भवनला पाठिंबा देत असून त्यांनी असंख्य कार्यक्रम आणि कलाकारांना सातत्याने पाठिंबा दिला आहे.
एमबीई पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. मत्तूर नंदकुमारा म्हणाले, “राजे द किंग चार्ल्स तिसरे यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाल्याबद्दल मी अत्यंत नम्र आणि कृतज्ञ आहे. यूके आणि उर्वरित जगामध्ये भारतीय अभिजात कला शिकविण्यासाठी आणि सहजी उपलब्ध करून देण्याकरता माझे प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी मी बांधील आहे. मी माझे कुटुंब, मार्गदर्शक, सहकारी आणि विद्यार्थ्यांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञ आहे. त्यांच्याशिवाय हे शक्य झाले नसते.”
संस्कृत शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि जतन करण्यासाठी डॉ. नंदकुमारा यांच्या उत्कृष्ट कामगिरीला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये २०११ मधील कन्नड राज्योत्सव पुरस्कार, कला आणि संस्कृतीतील योगदानाबद्दल हिंदी समिती यूकेचा संस्कृती सेवा सन्मान आणि इंडिया इंटरनॅशनल फाऊंडेशनद्वारे स्थापित आणि बॅरोनेस उषा प्रशार यांच्या हस्ते २००६ मध्ये कला आणि संस्कृती क्षेत्रात अॅवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन या पुरस्कारांचा समावेश आहे.
अध्यापनाव्यतिरिक्त, डॉ. नंदकुमारा यांनी लंडनमध्ये अनेक संभाषणात्मक संस्कृत अभ्यासक्रमांचे आयोजन केले आहे आणि ते चालवले आहेत आणि संपूर्ण यूकेमध्ये हिंदू तत्त्वज्ञान आणि पौराणिक कथांच्या विविध पैलूंवर विस्तृत व्याख्याने दिली आहेत. त्यांनी यूके, युरोप आणि अति पूर्वेतील शेकडो हिंदू समारंभांचे संचालन केले आहे. वेद, उपनिषद आणि गीता यांच्या मुख्य भागांवरील वैयक्तिक संकल्पना भाष्यावर लक्ष केंद्रित करून संस्कृत आणि कन्नड या दोन्ही भाषांमध्ये अनेक कविता देखील लिहिल्या आहेत.
डॉ. नंदकुमारा यांनी द भवनच्या कल्याणासाठी मैफिली आयोजित करून यूकेमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी योगदान दिले आहे. या मैफलींमध्ये पं रविशंकर, पं बिरजू महाराज, डॉ. बालमुरलीकृष्ण, पं. जसराज, डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम, पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद झाकीर हुसेन आणि अनुष्का शंकर यांसारखे नामवंत कलाकार आजवर सहभागी झाले आहेत. १९८४ पासून प्रतिवर्षी त्यांनी ८० हून अधिक कार्यक्रम सादर केले आहेत. त्यात प्रख्यात कलाकार आणि विद्वान सहभागी झाले. त्यापैकी अनेकांनी कार्यशाळा आणि व्याख्यान प्रात्यक्षिके यांचे आयोजन केले.
भारतीय संस्कृती आणि संस्कृत शिक्षण यांचा प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी असलेले डॉ. नंदकुमारा यांचे समर्पण, ज्ञान आणि योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
[…] मुंबई दि. २० एप्रिल – खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या पत्रात केली आहे.http://sindhudurgsamachar.in/प्रसिद्ध-संस्कृत-अभ्यासक/ […]
[…] नगर रचना अधिकाऱ्यांना आराखडा यल्लो करण्यासाठी दिला पिवळा रंग आणि ब्रश, आराखड्यात ग्रीन झोनमधील जमिनी यल्लो झोन करण्याची उपनगराध्यक्ष देत आहेत खात्री – शिवसेना शहरप्रमुख उमेश वाळके यांचा आरोप . http://sindhudurgsamachar.in/प्रसिद्ध-संस्कृत-अभ्यासक/ […]