अभिनेता कमल हसन यांना कोरोनाची लागण झाली असून चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत. कमल हासन यांनी स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.कमल हसन यांनी एका ट्विटमध्ये सांगितले आहे की, ते हाऊस ऑफ खडर क्लोदिंग लाइन लॉन्च करण्यासाठी गेले होते.”अमेरिकेतून परतल्यानंतर मला सौम्य खोकला झाला होता. माझी कोविड चाचणी चाचणीत पॉझिटिव्ह आली आहे. मी रुग्णालयात आयसोलेटेड आहे. तुम्हा सर्वांना हे देखील समजले आहे की कोरोना महामारी संपलेली नाही. म्हणून सर्वजण सुरक्षित रहा.” त्यांनी सर्वांना सावध राहण्याचे आवाहन केले आणि म्हणाले की कोविड -19 गेलेला नाही.”असे ते म्हणाले आहेत.