फोर्ड कंपनीने घेत चेन्नई आणि गुजरातमधील आपले कारखाने बंद करण्याचा निर्णय

0
217

फोर्ड कंपनीने चेन्नई आणि गुजरातमधील आपले कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र,याबाबत फोर्ड मोटर कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यासंदर्भात कंपनीकडून अधिककृत घोषणा लवकरच करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कंपनीची परिस्थिती अधिकच बिकट झाली. वाहनांच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे. कोरोना काळात कंपनीला सुमारे 2 अब्ज डॉलर्सचा फटका बसला. याच कारणामुळे फोर्ड मोटरनं आता चेन्नई आणि गुजरातमधील आपले कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे असं सांगण्यात येत आहे. इकोस्पोर्ट, फिगो आणि एस्पायर सारख्या वाहनांची विक्री देखील कंपनी बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.महिंद्र अॅण्ड महिंद्रासोबत असलेली भागीदारी संपल्यानंतर फोर्ड कंपनीने आपले कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

फोर्डच्या आधी, जनरल मोटर्स आणि हार्ले-डेव्हिडसन सारख्या दिग्गज अमेरिकन ऑटोमोबाईल कंपन्यांनीही भारतातून आपला व्यवसाय गुंडाळला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here