भारतीय जनता पक्षाच्या बिड च्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. बिड ची उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी ना. रामदासआठवले यांची भेट घेतली. https://sindhudurgsamachar.in/kokan-पक्ष-वेगळे-असले-तरी-समाज/
यावेळी रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील.बिड मधील केज विधानसभा रिपब्लिकन पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत सोडावा अशी सूचना यावेळी ना. रामदास आठवले यांनी केली. यावेळी ना.रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले आणि पुत्र जीत आठवले उपस्थित होते.