कोरोनाचा विषाणू सातत्याने रुप बदलत आहे. त्यामुळे नव्या व्हेरियंटवर लस किती प्रभावी आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यातच ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाही काळजी घेणे गरजेचे आहे़ मास्क लावणे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळणे त्यांच्यासाठीही हे गरजेचे आहे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया असे यांनी सांगितले आहे .
भारतात लसींचे दोन डोस घेतलेल्या लोकांनाही मास्क वापरणे अनिवार्य आहे. याबाबत सरकार आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिके प्रमाणे भारतात घोषणा करणे सध्या घाईचे ठरेल. त्यामुळे आपल्याला मास्क वापरत राहणे गरजेचे आहे तसेच, फिजिकल डिस्टंन्सिंग पाळणेही गरजेचे आहे. कारण व्हेरियंट कुठलाही असला तरी मास्क आणि फिजिकल डिस्टंन्सिंग आपल्याला वाचवेल.